बेकायदेशीरपणे मुरूम चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
254

गहुंजे, दि. १२ (पीसीबी) – एका कंपनीच्या जमिनीवर कंपाउंड तोडून प्रवेश केला. त्यानंतर त्या जमिनीतून सहा लाखांचा मुरूम बेकायदेशीरपणे चोरून नेला. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 जून ते 30 जून या कालावधीत गहुंजे येथे घडला.

प्रवीण पांडुरंग बोडगे, कुलदीप गोविंद बोडके (दोघे रा. गहुंजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत चंद्रशेखर श्रीकृष्ण ओगले (वय 54, रा. बोरिवली पूर्व, मुंबई) यांनी बुधवारी (दि. 11) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे गावातील गट नंबर 159 मधील एक हेक्टर 70 आर एवढी जमीन पेनिनसुला लँड लिमिटेड या कंपनीची आहे. या जमिनीवर फिर्यादी यांनी कंपाउंड केले आहे. ते तारेचे कंपाउंड तोडून आरोपींनी तीन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यांनतर फिर्यादी यांच्या जमिनीमधून सहा लाख रुपयांच्या मुरुमाची बेकायदेशीरपणे चोरी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.