बुलडाण्याच्या बालारफीक शेखने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा 

0
526

जालना, दि. २३ (पीसीबी) –  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी गट किताबी लढतीच्या अंतिम सामन्यांत बुलडाण्याच्या बालारफीक शेख यांने पुण्याच्या गतविजेत्या अभिजित कटकेला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. जालन्याच्या बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात रंगलेल्या कुस्तीत गुणांच्या जोरावर बालारफीख शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. ११-३ अशा  गुणाने त्याने अभिजितवर मात केली.