बुधवारी देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड शहरात

0
295

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक संदर्भात २५ नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड – पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी बुधवार (दि.२५) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी १० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम दादा देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.