बुडत्या नावेत कोण बसणार? ; राणेंच्या काँग्रेसप्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

0
439

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – ‘बुडत्या नावेत कोण बसणार? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  मुख्यमंत्री  दिल्लीत बोलत होते. राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. 

नारायण राणेही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. दिल्लीत ते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. परंतु, यावेळी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यास  नारायण राणे यांनी नकार दिला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.    काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राणेंच्या घरवापसीच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे गोवा मार्गे दिल्लीला दाखल झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांचा इन्कार केला आहे.