बीड येथील ऑनर किलिंग प्रकरणी एकाला अटक

0
1369

बीड, दि. २४ (पीसीबी) – प्रेम विवाह केला म्हणून सुमित वाघमारे या तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या एका आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि सुमित वाघ हे दोघेही अद्याप फरार आहेत.

कृष्णा क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या  आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी लांडगे याची बहिण भाग्यश्री हीने सुमित वाघमारेसोबत दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. याचा राग बालाजी डोक्या होता. यामुळे बालाजी आणि त्याचा मित्र सुमित वाघ या दोघांनी धारदार चाकून भाग्यश्रीसमोरच सुमितचा खून केला आणि फरार झाले.  या गुन्ह्यातील आरोपी बालाजी आणि सुमित याला पळवण्यात आरोपी कृष्णा क्षीरसागरने मदत केल्याचे पोलिसांना कळाले. यामुळे पोलिसांनी कृष्णा याला अटक केली. त्याच्याकडून मुख्य आरोपींपर्यंत पोहचण्यात काही धागेदोरे मिळतात का याकडे सर्वंचे लक्ष असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही म्हणून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.