बीजलीनगर येथे दुचाकीस्वाराला मारहाण करुन चोरट्यांनी पळवला ३७ हजारांचा मोबाईल

0
554

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – दुचाकीस्वाराला आढवून जबर मारहाण करत त्याच्या जवळी महागडा असा वनप्लस ५ टी या कंपनीचा तब्बल ३६ हजार ९०० रुपयांचा मोबाईल चार अज्ञाक चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना बिजलीनगर, रेल्वेस्टेशन शेजारील गुरुव्दारा चौकरोड येथे घडली.

याप्रकरणी दुचाकीस्वार प्रथमेश ऋषीकुमार मोरे (वय २०, रा. गंगानगर, ऋतुजा कॉम्प्लेक्स, सेक्टर २८, प्राधिकरण) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.७) रात्री अडीजच्या सुमारास प्रथमेश हा त्याच्या दुचाकीवरुन बिजलीनगर, रेल्वेस्टेशन शेजारील गुरुव्दारा चौकरोड येथून जात होता. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या चौघा चोरट्यांनी प्रथमेश याची दुचाकी आढवली. तसेच त्याला मारहाण करुन त्याच्याजवळील महागडा असा वनप्लस ५ टी या कंपनीचा तब्बल ३६ हजार ९०० रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव चोरट्यांचा शोध घेत आहेत.