बापरे! फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने झाली सव्वा लाखांची फसवणूक

0
287

वाकड, दि. ५ (पीसीबी) – फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीकडून सव्वा लाख रुपयांचे टोकण घेतले. त्यानंतर टोकण घेतलेल्या व्यक्तीला फ्लॅट न विकता अन्य व्यक्तीला विकला तसेच टोकण म्हणून घेतलेले पैसेही परत न देता व्यक्तीची फसवणूक केली.

रितेश गौरीशंकर अग्रवाल रा. अजनी, नागपुर, संतोष गुंजाळ रा. पिंपळे सौदागर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिरुद्ध अरुण कोतकर वय 36, रा. चिखली यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे सौदागर येथील मिथ्रास पार्क हाऊसिंग सोसायटी मधील पाचव्या मजल्यावरील एक फ्लॅट विकायचे असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून टोकण रक्कम म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी ही रक्कम धनादेशाच्या स्वरूपात दिली. धनादेश वटवून आरोपींनी ती रक्कम 24 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर तो फ्लॅट आरोपींनी अन्य एका व्यक्तीला विकला. यात आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच त्यांनी टोकण म्हणून दिलेले पैसे त्यांना परत न देता त्या पैशांचा अपहार केला. फिर्यादी यांनी आरोपींना वारंवार पैसे मागण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी घेतलेले पैसे परत देतो असे सांगत. त्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.