बाणेरमध्ये शिवजातस्य फॅशन शोमधून शिवकालीन संस्कृतीचे सादरीकरण

0
778

पुणे, दि. २७ (पीसीबी) – महाफॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेरमधील वृंदावन लॉन्स येथे “शिवजातस्य” फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमधून करण्यात आला. शिवकालीन संस्कृती बरोबरच पेशवाई आणि मोघल साम्राज्यातील पेहेरावही सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तष्टचे दिपक माने यांनी शिवजातस्य विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आतापर्यंत फॅशन शोच्या माध्यमातून अनेक संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे. परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव पहिल्यांदाच शिवजातस्य या फॅशन शोमधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या अनोख्या फॅशन शोची संकल्पना महाफॅशन फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांची होती. फॅशन शोचे दिग्दर्शन प्रख्यात फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजित जोगळेकर यांनी केले होते. निवेदन अमोल मोरे यांनी केले.