बनावट स्पेअर पार्ट विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

0
149

दि 3 एप्रिल (पीसीबी )- टीव्हीएस कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्या प्रकरणी भोसरी परिसरातील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २) सायंकाळी करण्यात आली.

जयेश उकमलजी जैन (वय ३४, रा. दिघी रोड, भोसरी), मनोज खिमजी पलान (वय ५६, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी टीव्हीएस कंपनीचे डिव्हिजन ऑफिसर पियुष राऊत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर खंडोबा माळ चौक भोसरी येथे जय गोगा ऑटोमोबाईल आणि पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी उड्डाणपुलाजवळ मनोज ऑटो पार्ट या दुकानांमधून टीव्हीएस कंपनीचे बनावट पार्ट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे डिव्हिजन ऑफिसर राऊत यांनी खातरजमा करून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ५१ हजार ८११ रुपये किमतीचे बनावट पार्ट जप्त केले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.