बँक कर्मचारी बोलत असल्याचे सांगून एकाची १ लाख 33 हजारांची ऑनलाइन फसवणूक

0
287

पिंपरी, दि.०८(पीसीबी) : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे रीव्हर्ट झालेले पॉइंट परत मिळवून देतो असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने एकाची एक लाख 33 हजार 200 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. हा प्रकार 18 डिसेंबर 2019 रोजी न्युओलॉजी कंपनी, बाणेर येथे घडला असून याबाबत 7 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध प्रकाश कोठडिया (वय 49, रा.लॉ कॉलेज रोड,पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 18 डिसेंबर 2019 रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने कोठडिया यांना फोन केला. आपण आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट, पे बँक विभागातून मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत तुमचे एक्सपायर झालेले क्रेडीट कार्डचे पॉइंट रीव्हर्ट करून देतो, असे आमिष दाखवले आणि कोठडिया यांच्या मोबईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. ओटीपी भेटल्याने आरोपीने कोठडिया यांच्या बँक खात्यातून एक लाख 33 हजार 200 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. हि घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.