फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरी

0
346

चाकण, दि. १९ (पीसीबी) – चाकण येथे एचडीबी फायनांसियल सर्विसेस या कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आली.

प्रफुल्ल सुरेश जागरवाल (वय 39, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एचडीबी फायनांसियल सर्विसेस ली. या कंपनीच्या कार्यालयात सोमवारी (दि. 17) रात्री आठ ते मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.