प्रो कबड्डी लीग: ‘चांगले खेळाडू असाल तर निश्चित चांगला दाम मिळतो’

0
504

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – तुम्ही जर चांगला खेळ खेळत असाल तर प्रो कबड्डी लीगमध्ये निश्चित चांगला भाव मिळतो आणि तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता अशी माहिती यु मुम्बाचा खेळाडू फैजल अत्राचलीने दिली आहे. फैजल हा इराणी कबड्डीपटून असून प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे.

२०१४मध्ये तेहरानहून कोसोदूरवर असलेल्या आपल्या गावी फैजल कात्र्या बनवण्याचे काम करायचा. त्याच्या सामान्य आयुष्यात तो सुखी होता त्याच्या खेळावर मात्र तो समाधानी नव्हता. ७ वर्षांचा असतानाच त्याने कुस्तीचा नाद सोडून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली होती. २०१४मध्ये एशियन गेमच्या अंतिम फेरीत त्याच्या संघाने भारताला कडवी झुंज दिली होती. या सामन्यात भारताने २७-२५ने इराणला मात दिली होती. इराणमध्ये हा खेळ अत्यंत कमी प्रसिद्ध होता. वर्ल्डकपशिवाय आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळण्याची संधीही इराणी खेळाडूंना मिळत नव्हती. पण प्रो कबड्डीमुळे लीगमुळे फैजलचे आयुष्यच बदलले. २०१५मध्ये यु मुम्बा संघाने ४ लाख रुपयांना फैजलला विकत घेतले. खूप कमी सामन्यांमध्ये तेव्हा फैजलला खेळण्याची संधी मिळाली. पण त्याच्या खेळासाठी त्याचे भरपूर कौतुक करण्यात आले. २०१९मध्ये फैजल त्याच्या खेळाच्या जोरावर प्रो कबड्डी लीगमधील सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. आपल्या गावी लोहारकाम करायची काहीच गरज त्याला उरलेली नाही.