प्रेमसंबंध उघड करणे जीवावर बेतले असते….

0
236

सोमाटणे, दि. १३ (पीसीबी) – एक मित्र दुस-या मित्राचे एका मुलीसोबत प्रेमसंबध असल्याचे इतर मित्रांना सांगत होता. त्याचा जाब विचारल्याने तीन मित्रांनी मिळून दोघा भावांना हाताने, दगडाने आणि लोखंडी कलथ्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 12) दुपारी सोमाटणे-परंदवडी रोडवर घडली. आकाश श्रीरंग साळुंखे (वय 23, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रकाश साळुंखे अशी जखमींची नावे आहेत. आकाश यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतन दत्तात्रय पोकळे, चेतन दत्तात्रय पोकळे, निखील दत्तात्रय पोकळे (सर्व रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, ता मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपी केतन हा फिर्यादी आकाश यांचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे इतर आरोपींना सांगत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी केतन याला त्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आकाश आणि त्यांचा भाऊ प्रकाश या दोघांना हाताने, दगडाने व लोखंडी कलथ्याने मारहाण केली. यात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ दोघेही जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.