प्रियंका गांधी हुकमी एक्का, तर राहुल गांधी जोकर; भाजप महिला नेत्याची टीका  

0
509

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – प्रियंका गांधी म्हणजे  हुकमी एक्का  तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणजे जोकर आहेत का?  अशी टीका भाजपा नेत्या सरोज पांडे यांनी केली आहे.  काँग्रेस आत्तापर्यंत जोकर घेऊन खेळत होते का? असेही  त्यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी या जर एक्का आहेत तर त्यांना राजकारणात याआधीच का आणले गेले नाही? असाही प्रश्न सरोज पांडे यांनी केला. काँग्रेस फक्त स्त्रीच्या सौंदर्याचा विचार करू शकतात, त्याचमुळे प्रियंका गांधीना राजकारणात आणले गेले आहे. प्रियंका गांधींच्या मुलांनाही काँग्रेसने राजकारणात आणावे, अशीही टीका  त्यांनी केली आहे.

प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ‘दहन करो मोदी की लंका, बहन प्रियंका.. बहन प्रियंका’ अशा घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत. आता या  घोषणा आणि प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर भाजप नेत्यांनी  टीका करण्यास सुरुवात केली आहे.