प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय; उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी

0
437

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – काँग्रेसने अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर   प्रियंका गांधी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती  केली आहे. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे  काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये  आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रियंका गांधींसह  ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिममधील महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच के सी वेणुगोपाल यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   गेल्या काही वर्षांपासून  प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी कार्यकर्त्यांकडून सातत्याने  मागणी  केली जात  होती.

प्रियंका गांधी  उत्तर प्रदेशात निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचारात सक्रीय असायच्या.  . मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची  जबाबदारी  देण्याची मागणी केली जात होती.  ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.