प्राधिकरणातील ‘ग. दी. माडगूळकर नाट्यगृहा’चे काम ठेकेदाराला पोसण्यासाठीच

0
183

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात अनेक मोठ-मोठे प्रकल्प विकसित केले आहेत. त्या कोणत्याही विकास कामांना येवढा कालावधी लागला नाही तेवढा निगडी प्राधिकरण मधील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह पुर्ण होण्यासाठी लागत आहे. केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठीच हा विलंब असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्याबाबतचे एक निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने आज दिले.

निवेदनात मनसे म्हणतात, नोव्हेंबर 2014 मध्ये नाट्यगृहाची वर्कऑर्डर निघून जानेवारी 2015 ला काम सुरू करण्यांत आले आहे. आज 2021 आहे, तब्बल 6 वर्ष झाले आहे. आजही नाट्यगृहाचे काम सुरूच आहे. अनेक वेळा मुदत वाढून निधी वाढुनही नाट्यगृहाचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे जनतेच्या कररुपी पैशाचा वापर ठेकेदार पोसण्यासाठी तर होत नाही ना , अशी अशी शंका आहे. अनेक कोटींचा निधी कामासाठी वाढवून देऊनही परत अन्य कामांसाठी काही कोटींची तरतूद करण्याचे आपल्या अधिकारी वर्गाकडुन चालले आहे. नागरिकांच्या कर रुपी भरलेल्या पैशांची उधळण थांबवा. लवकरात लवकर नाट्यगृहाचे कामं पूर्ण करा, अशी आग्रही मागणी केली आहे.
नाट्यगृह कलावंतांना व नागरिकांना केंव्हा उपलब्ध होईल ? हे लेखी स्वरुपात द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी मनसेचे महापालिकेतील गटनेते सचिन चिखले, उपशहराध्यश्र राजू सावळे, विद्यार्थी सेना मनसे
शहराध्यक्ष हेमंत डांगे, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, मनसे वाहतबक सेनेचे सुशांत साळवी, जनहित कक्षाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, जयवंत चितळकर, ओंकार पाटोळे आदी यावेळी उपस्थित होते.