प्रबोधनकार ठाकरे यांचे पुरोगामी विचारधन सर्वांनी आचरणात आणणे राज्याच्या हिताचे … डॉ. रघुनाथ कुचिक

0
582

पुणे, दि. 17 (पीसीबी): प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन युवाशक्ती पुणे शहर यांच्या वतीने अभिवादन सभा व प्रबोधन युवाशक्ती च्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा आज प्रबोधन कार्यालयात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी किमान वेतन सल्लागार मंडळ अध्यक्ष व शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथ कुचिक बोलत होते .

प्रबोधनकार ठाकरे यांचा समतेचा न्याय विचार महाराष्ट्रासाठी सार्वकालिक हिताचा असून , तरुण पिढीने त्याच आचरण करणे राज्याच्या हिताचे असून , समता न्याय बंधुता या वारकरी संप्रदायातील मानवीय मूल्यांचा जागर होणे , अन तरुणांनी जात पात निरपेक्ष पुरोगामी विचार अंगी बाळगून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी धडपड करणे हेच प्रबोधनकार ठाकरे यांच स्वप्न होते , तरुणांनी अस आचरण करणे हीच प्रबोधनकार ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रघुनाथ कुचिक यांनी पुढे बोलताना केले , याप्रसंगी सुवर्णा कुमार बोराटे यांना प्रबोधन गौरी गणपती राज्यस्तरीय सजावट महास्पर्धेतील विजेते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला ,याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या गायत्री भागवत , सोनाली निकम , संदीप वाघमारे ,सचिन पाटील , निलेश लंगोटे , सुधीर चिंचोलीकर , दिलीप पल्लाकोंडा उपस्थित होते .