प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला- रामदेव बाबा

0
647

पाटणा, दि. २७ (पीसीबी) – शहीद हेमंत करकरे माझ्या शापामुळे मारले गेले, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रज्ञा ठाकूर यांना पाठिंबा दर्शवला आहे.

प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबांनी केले आहे. ते पाटणा येथे पत्रकारांशी बोलत होते.

केवळ संशयाच्या आधारावर एका महिलेला तुरुंगात ठेवण्यात आले. तसेच तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला, असेही रामदेव बाबा म्हणाले.