प्रकाश राज यांचा मोदी-शहांना सवाल;तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का ?

0
508

नवी दिल्ली,दि.२४(पीसीबी) –नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून देशात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत . अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक रुप धारण केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करताना बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोलिसांकडून आंदोलकांना करण्यात येणाऱ्या मारहाणीचा व्हीडिओ पोस्ट करत ‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का’, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला आहे.

दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला.