पोलीस आयुक्त कार्यालयात राडा घालणाऱ्या मद्यपी विरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल

0
372

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – कृष्ण प्रकाश साहेब मला न्याय द्या, असे म्हणत पोलीस आयुक्त कार्यालयात राडा घालणाऱ्या मद्यपी विरोधात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ साठे, मोहित भोसले (दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी अमित रामचंद्र गावडे (वय 28, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शननगर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या फिर्यादी यांच्या कारची आरोपी विश्वनाथ याने दारूच्या नशेत तोडफोड केली. फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपी विश्वनाथ याने पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन राडा घातला. कृष्ण प्रकाश साहेब मला न्याय द्या, असे म्हणत त्याने आरडाओरडा केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.