पोलीस असल्याचे सांगून स्पा सेंटर चालकाकडे मागितली एक लाखांची खंडणी..

0
406

पिंपळे सौदागर, दि. ८ (पीसीबी) – पोलीस असल्याचे सांगून एका तरुणाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाखाची खंडणी मागितली. तसेच त्यातील काही पैसे स्वीकारले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे घडली.विशाल कैलास जोंजाळे (वय 28, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश शांताराम शिंदे (वय 26, रा. लोहगाव पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचा कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे स्पा मसाज सेंटर आहे. आरोपी विशाल याने स्पा मसाज सेंटर मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास आरोपीकडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेल अशी देखील आरोपीने धमकी दिली. त्या आधारे त्याने स्पा मसाज सेंटर मध्ये पाच हजार रुपये रोख रक्कम, ऑनलाइन माध्यमातून एक हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर 70 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.