पैशांच्या कारणावरून ‘या’ प्रसिद्ध व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

0
211

तळेगाव दाभाडे, दि. २१ (पीसीबी) – पैशांच्या कारणावरून मारून टाकीन अशी धमकी देत दोघांनी मिळून एका व्यावसायिकाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. तसेच ऑफिसमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 20) वराळे येथील मधुबन पॅकेजिंग सोल्युशन येथे घडली.

राकेश मधुसूदन शहा (वय 53, रा. वराळे, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी काबील उद्दीन गोगरब अली (वय 21, रा. हेगाव, ता. हवेली. मूळ रा. आसाम), मिनहजुर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी सकाळी नऊ वाजता फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले. पैशांच्या कारणावरून वाद घालून त्यांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर ऑफिसच्या खाली जाऊन लोखंडी रॉड आणून त्याने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या ऑफिसमधील टीव्ही फोडून नुकसान केले. पोलिसांनी आरोपी काबील याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.