पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते; पोलिसांनी लावला सापळा…पण घडले ‘असे’ काही

0
326

वाकड, दि. २५ (पीसीबी) – डांगे चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला आहे. यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता केली.

तुषार आनंद भरोसे (वय 22, रा. पुणे), सिद्धार्थ आनंत भगत (वय 21, रा. पुणे), प्रेमशीतल जानराव (वय 19, रा. पुणे), स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 22, रा. रहाटणी), श्रीपाद उर्फ ओंक्या मारुती कामत (वय 18, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपार काहीजण डांगे चौकातील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पालघन, कुकरी, कोयता, रस्सी, टॉमी, मिरची पूड इत्यादी दरोड्याचे साहित्य मिळाले. सर्व आरोपी डांगे चौकातील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.