पॅक्केट्टाच्या गोलने ब्राझीलला वाचवले

0
191

रिओ दि जानेरियो, दि. 3 (पीसीबी) : उत्तरार्धाच्या सुरवातीलाच गॅब्रिएलला जीझसला रेड कार्ड मिळाल्यानंतरही दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या ब्राझीलने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी चिलीचा १-०असा पराभव केला. उपांत्य फेरीत आता त्यांची गाठ ५ जुलै रोजी पेरु संघाशी पडेल. त्यांनी नियोजित सामन्यातील वेळेनंतर पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव केला. ब्राझील आणि चिली या दोन माजी विजेत्यांमधील लढत तशीच चुरशीची झाली. ब्राझील ब गटात अव्वल आले होते. ते सलग ११ सामने अपराजित आहेत. चिली अ गटात चौथ्या स्थानावर राहिले होते. ते गेल्या सहापैकी चार सामन्यात त्यांनी १-१ अशी बरोबरी पत्करली आहे. तर दोन सामने ते हरले आहेत.

पूर्वार्ध गोलशू्न्य बरोबरीत गेल्यानंतर उत्तरार्धात तेवढीच आक्रमक सुरवात झाली. राखीव खेळाडू पॅक्वेटा आणि नेमार यांनी वन-टू करत सुरेख मुसंडी मारली होती. हीच लय कायम ठेवत पॅक्वेटाने उत्तरार्धाच्या ४६व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते उघडले. त्यांच्या या आनंदावर दोनच मिनिटांनी विरझण पडले. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला गॅब्रिएल जीझस याला पंचांनी तेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. त्यामुळे ब्राझीलला नंतर दहा खेळाडूंसहच खेळावे लागले. जीझसच्या कुंग फु स्टाईलच्या किकने युजेनियो मेना याला पाडले होते.

घरच्या मैदानावर खेळताना खरे तर ब्राझीव कधीच दडपणाखाली नसते. पण, या वेळी चिलीने त्यांना सतत दडपणाखाली ठेवले होते. मात्र, त्याचा फायदा उठविण्यात त्यांना यश आले नाही. चिलीने मध्यंतरांतर सॅंचेझच्या जागी बेन बेरेटनला उतरवले. त्याचा हेडरने गोल करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू गोलपोस्टच्या बारला धडकून बाहेर गेला. त्यानंतरही ब्राझीलचा गोलरक्षक एंडरसनला चांगलेच सतर्क रहावे लागले. त्याने चिलीचे दोन-तीन धोकादायक प्रयत्न शिताफीने परतवून लावले.

आम्ही संभाव्य विजेत्या संघाकडून हरला. ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. घरच्या मैदानावर खेळताना ते नेहमीच सरस असतात. आम्हाला ताठ मानेने बाहेर पडल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया चिलीचा मध्यरक्षक अर्टुरो व्हिडाल याने व्यक्त केली.