पुरस्कार समाजिक कार्याची जबाबदारी वाढवते : बाबा कांबळे

0
145

कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भूषण पुरस्काराचे वितरण

आळंदी येथे हराळे वैष्णव धर्मशाळेच्या वतीने आयोजन

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – वारकरी हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम वारकरी करतात. सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा (आळंदी देवाची) या संस्थेच्या वतीने वारकरी भूषण, समाज भूषण, समाजरत्न पुरस्कार प्रधान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर रविवारी (दि. 10) दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा कांबळे मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी संत रोहिदास महाराज उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, चर्मकार उठाव संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, हवेली कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, मरकरचे माजी सरपंच तुकाराम वाहिले, माजी नगरसेवक धांजय अल्हट संतोष दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, दिंडी क्रमांक 24 चे सर्व पदाधिकारी व आदींसह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आळंदी येथे कार्तिकीवारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्राचा देशभरातील वारकरी भाविक भक्त आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा हा महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासातील प्रमुख सोहळा असून या सोहळ्याच्या निमित्ताने समस्त समाधर्माच्या आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या वर्षी देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वारकरी भूषण, समाज भूषण आणि समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या कार्यक्रमात अभ्यूदय बँकेचे माजी अध्यक्ष संदीप घनदाट यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. शिवाजी भगत यांना वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बरोबरच सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ तांदळे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शिक्रापुरचे सरपंच रमेश गडदे, उद्योजक महेंद्र निघोजकर, नंदकुमार सोनवणे, सुरेश कानडे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या बरोबरच सानिका आबनावेचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब वसंत चव्हाण (मरकळ), सुरेश तुकाराम गाडेकर (भोसरी), विठ्ठल मारुती शिंदे (खेड), बबन विठोबा पटेकर (चन्होरी खुर्द), शुभांगी रामदास गाडेकर (वडू), विश्वस्त राजु दत्तात्रय कांबळे (आळंदी दे.), श्रीरंग परशुराम आबनावे (घोरपड पेठ, पुणे), अनिल विश्वनाथ सातपुते (धनकवडी, पुणे), बाळासाहेब वसंतराव साळुंके (चाकण), तुषार लक्ष्मण नेटके (आळंदी दे.), कांतीलाल हरिभाऊ गाडेकर (आपटी), सचिव डॉ. किसन तुकाराम कांबळे (आर), खजिनदार : श्री. चंद्रकांत निवृत्ती कानडे (भोसेकर), सहखजिनदार : श्री. सोपान मारुती गवळी (मोशी), विश्वस्त दिपक महादू चव्हाण (मरकळ), अतुल लक्ष्मण कानडे (कन्हेरसर, खेड), श्रीकुमार परशुराम काळे (घोरपडे पेठ, पुणे), सुखदेव नारायण सुर्यवंशी (पुणे), मालन बाबु दळवी (लोणीकंद), ज्ञानेश्वर आत्माराम कारंडे (पद्मावती, पुणे), ज्ञानेश्वर निवृत्ती गजतरे (डोंगरगाव), आनंदराव सोनवणे (करंदी) आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.