पुण्यात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विराट मोर्चा

0
310

पुणे,दि.२९(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या मुद्द्यांवरुन देशात अशांतता आणि अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात नागरिकत्व कायद्याविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

सुधारित्व नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्ध रविवारी शहरात मुस्लीम समाज संघटनेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदान ते कौन्सिल हाॅल असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी प्रतिसाद दिला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील शहरात तैनात करण्यात आल्या होत्या.