पुणे शहरात कोरोनामुळे पोलीस फोजदार लोंढे यांचा मृत्यू; पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

0
324

पुणे,दि४ (पीसीबी) : कोरोना संसर्गामुळे आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भारती रुग्णालय धनकवडी येथे उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला. तर, आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

50 लाखांचं कवच
राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, चार पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.