पुणे जिल्ह्यात एकूण 8 हजार 134 कोरोनाबाधित

0
537

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहे. मुंबईत आज 1 हजार 109 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 986 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात आज 308 नव्या रुग्णांची भर पडली असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे. दरम्यान, अनेक डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.