पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयांचा पास संपर्क साधण्यासाठी तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक, ई-मेल

0
686

पुणे, दि. १ (पीसीबी) : महाराष्ट्र शासनने लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना मुळगावी पाठविण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे यासाठी प्रवास करणाऱ्या सर्वांचा समनव्य ठेवण्याची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे, निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी 15 तहसील कार्यालयांप्रमाणेच पाससाठी संपर्क साधण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष आणि त्याचे संपर्क क्रमांक, तसेच ई-मेल आयडी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातुन ज्यांना आपल्या घरी म्हणजेच, मूळ गावी जायचं आहे अशा लोकांनी, त्यांची माहिती ई मेल किंवा फोनवरून ते ज्या भागात राहतायत त्या तहसीलदार कार्यालयाला कळवायची आहे. त्यानंतर घरी जाण्यास इच्छुक असलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, अशा व्यक्तींना घरी पाठवण्याचा विचार करण्यात येणार आहे. जे परराज्यातील आहेत किंवा ज्यांना दुरवर प्रवास करावा लागणार आहे, अशा व्यक्तींसाठी प्रवासाची एकत्रित रुपरेखा आखण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे.

तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे :
तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – [email protected]
अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – [email protected]
तहसील पुणे शहर – 020-24472850 – [email protected]
तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – [email protected]
तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – [email protected]
तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – [email protected]
तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – [email protected]
तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – [email protected]
तहसील पुरंदर – 02115-222331 – [email protected]
तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil [email protected]
तहसिल आंबेगाव – 02133-244214 – [email protected]
तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – [email protected]
तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – [email protected]
तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur [email protected]
तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – [email protected]
———————————————