पिस्तूलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी; दोघांना अटक

0
268

रावेत, दि. १८ (पीसीबी) – पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती देत असल्याच्या संशयावरून तसेच तरुणांनी गुन्हेगारी सोडण्याचे एका वृत्तवाहिनीवर आवाहन केल्यावरून दोघांनी मिळून एकाला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री रमाबाईनगर, रावेत येथे घडली.

शिवकुमार बसवराज बनसोडे (वय 26), रवि काशिनाथ अशिंगळ (वय 21, दोघे रा. रमाबाईनगर, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विशाल चंदू कदम (वय 31, रा. रमाबाईनगर, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र समाधान संपत्ती सदवदे फिर्यादी यांच्या दुचाकीवरून रमाबाईनगर येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींच्या अवैध धंद्यांची माहिती फिर्यादी पोलिसांना देतात या संशयावरून तसेच फिर्यादी यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुणांनी गुन्हेगारीकडे वळू नये, असे आवाहन केले होते या कारणावरून आरोपींनी धमकी दिली. ‘तू काय लय मोठा नेता झाला काय. गुन्हेगारांचा व तुझा काय संबंध. तू आमची पोरं आमच्यापासून तोडतो काय’ असे म्हणत आरोपी शिवकुमार याने त्याच्याकडील पिस्टल दाखवून ‘तू जर जास्त नेतेगिरी केलीस तर तुझा या पिस्तुलाच्या गोळीने जीव घेऊ’ अशी धमकी