पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी विराट कोहलीला दंड   

0
486

गुरुग्राम, दि. ८ (पीसीबी) – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी   गुरुग्राम महापालिकेने  पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोहलीच्या गुरुग्राममधील निवासस्थानी काम करणारे कर्मचारी गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.

गुरुग्राममधील डीएलएफ फेज १ मध्ये विराट कोहलीचे घर आहे. घराबाहेर कोहलीच्या मालकीच्या सहा गाड्या उभ्या असतात. या गाड्या धुण्यासाठी कोहलीचे कर्मचारी पिण्याचे पाणी वापरत असल्याची तक्रार त्याच्या शेजाऱ्यांनी दिली होती. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे गुरुग्राम महापालिकेने कोहलीच्या स्टाफकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान, उत्तर भारतमध्ये उष्णतेची मोठी लाट आली आहे.  त्यामुळेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.  अशा परिस्थितीत गाड्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करणे, बेजबाबदारीपणा आहे.  त्यामुळे  गाड्या धुण्यासाठी पाणी वापरल्याने  संताप व्यक्त  केला जात आहे.