पिक पंचनाम्यासाठी मोबाइलवरून फोटो पाठवले तरी चालतील- देवेंद्र फडणवीस

0
535

मुंबई, दि. १ (पीसीबी) – राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये दुष्काळी भागाची पाहणी करण्यास गेलेल्या कृषीराज्यमंत्र्यांपुढे शेतकरी अक्षरश: रडले. त्यानंतर सरकारला जाग आलेली दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. त्या कंपन्यांना पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक, नागपूरसह कोकणातही पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, याचा आढावा घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.