पिंपळे सौदागर येथे आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते ‘इ-स्कूटर’ चे लोकार्पण

0
729

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथे हिरो कंपनीची ‘लीप इ-स्कूटर सेवा’ नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे आणि नगरसेविका  निर्मलाताई कुटे  यांनी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे भाजप शहराध्यक्ष व आमदार  लक्ष्मण जगताप  यांच्या हस्ते  ‘इ-स्कूटर’ चे लोकार्पण आज (रविवार)   करण्यात आले.     

नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटी कडे वळवत  ‘ग्रीन सौदागर क्लिन सौदागर’  हा ध्यास मनात घेऊन  ‘लीप इ-स्कूटर सेवा’ सुरू केली आहे. वाढती महागाई आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी  ही संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर रहिवाशांसाठी   सुरू करण्यात आली आहे.

ही  ‘इ-स्कूटर’  अँड्राईड  अॅपद्वारे चालू किंवा बंद करता येते. स्कूटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा फुल्ल चार्ज केल्यावर ६० किलोमीटर अंतर धावू शकते. चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात.  या  स्कूटरची टॉप स्पीड  २५ किलोमीटर प्रति तास इतकी आहे. स्कूटर चालवण्यासाठी पाहिले १५ मिनिट राईड फ्री असणार आहे.  त्यानंतर १.५० रुपये पर मिनिट भाडे आकारण्यात येणार आहे. यूपीआय  अप्स्‌ द्वारे पैसे पेड करून  इ-स्कूटर चालवण्याचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. पिंपळे सौदागर मध्ये अनेक ठिकाणी असलेले पेडल सायकल पॉईंट आहेत. त्या ठिकाणी  ‘इ-स्कूटर’ पॉईंट आणि  ‘इ-स्कूटर’ चार्जिंग पॉईंट  ठेवण्याचे नियोजन  केले आहे.

यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन जयनाथ  काटे,  उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा  कुंदाताई भिसे, चंदाताई भिसे, भानुदास काटे पाटील, शंकर आण्णा काटे, दत्तोबा काटे, शेखर कुटे, प्रकाश  झिंजुर्डे, पोपट काटे, कुंभार , विशाल शिंदे, राहुल सरोदे, विकास काटे ,  संजय भिसे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे,  नितीन कुंजीर,  अमोल थोरात,  दिपक गांगुर्डे आदी  उपस्थित होते.