पिंपळे निलख येथील पुरग्रस्तांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस  

0
786

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला महापूर आला आहे. यामुळे सांगवी, पिंपळे निलख परिसरातील रहिवाशी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे.

पिंपळे निलख  येथील स्थलांतरित केलेल्या नागरिकांची आज (मंगळवार) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली . तसेच नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. यावेळी  राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित होते.

दरम्यान, आज (मंगळवार) मुळशी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली असून पुरस्थिती निवाळण्यास सुरूवात झाली आहे.