पिंपळे गुरव येथे कोयत्याने वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी पाच जणांना अटक

0
1169

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – दोन गटातील वादातून पिंपळे गुरव ओंकार कॉलनी क्र.१ येथे घराबाहेर उभी असलेली वाहनांची सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी कोयते, हॉकीस्टीकने तब्बल सात वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि.२५) पहाटे एकच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, विशाल उर्फ पप्पु काशीद, विजय राजू काळे, आण्णा उर्फ युवराज कुमार स्वामी, रॉबर्ट उर्फ वैभव संजय गायगुले, प्रशांत राजु कदम (सर्व रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एकच्या सुमारास आरोपी आणि त्यांचे काही साथीदार पिंपळे गुरव ओंकार कॉलनी क्र.१ येथे आले. त्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांची कोयते, हॉकी स्टीकने तोडफोड केली. यामध्ये कार, रिक्षा आणि दुचाकींचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेमध्ये १३ वर्षीय मुलगा अंकीत सचिन चांदणे हा  घरच्यासोबत चर्चवरून त्यांच्या कारमधून घरी परतत होता. यावेळी टोळक्यांनी त्यांच्या कारच्या काचेवर कोयत्याने हल्ला केला. यामुळे कारची काच फुटली आणि अंकीतच्या डोळ्यात घुसली. यामुळे अंकितच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  सांगवी पोलीस तपास करत आहेत.