पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत लोकोपयोगी उपक्रम राबविण्यास भर – महापौर उषा ऊर्फ माई ढोरे*

0
266

पिंपळे गुरव येथे ७५ तासांत विकसीत केलेल्या “८ टू ८० पार्क”चे लोकार्पण*

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : महानगरपालिका व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात रस्ते विकासासह अनेक पायाभूत सुविधा असलेले प्रकल्प उभारले जात आहेत. शहराच्या आवश्यतेनुसार विकास कामे केली जात असून स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेला “८ टू ८० पार्क”सारखा लोकोपयोगी उपक्रम शहर विकासात मोठी भर घालणारा आहे, असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौकात ७५ तासांमध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत वयोगटातील व्यक्तींसाठी “८ टू ८० पार्क” विकसीत करण्यात आले. या पार्कचा लोकार्पण सोहळा महापौर यांच्याहस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त्‍ असे हे पार्क आहे. तीन दिवसांच्या कालावधीत भूमिपूजन आण‍ि लोकार्पण सोहळा यासाठी हा उपक्रमाचे विशेष असून अवघ्या ७५ तासांमध्ये पार्क उभारणे ही आश्चर्याची बाब असल्याचे सांगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पार्कची पाहणी करून कौतुक केले.

उद्यानामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांना उपयुक्त असणाऱ्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये लहान मुलांकरीता स्केटींग बोर्ड झोन, खेळाचे साहित्य, जंगल जिम, मेरीगो राऊंड, सिसॉ, बदक, साप शिडी, गेम झोन, इत्यादी व जेष्ठ नागरीकांसाठी बैठक व्यवस्था तसेच अँफीथेटर, पादचारी मार्ग, क्लॉक टॉवर, व्हिविंग टॉवर तसेच उपलब्ध जागेमध्ये बगिचा विकसित करण्यात आले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, जैवविविधता समिती अध्यक्षा तथा नगरसेविका उषा मुंढे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसेवक शशीकांत कदम, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका चंदा लोखंडे, माजी नगरसेवक शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सिनेट सदस्य संतोष ढोरे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अध‍िकारी निळकंठ पोमण, महाव्यवस्थापक अशोक भालकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, सहा.मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे, उपअभियंता (विद्युत) महेश कावळे, उपअभियंता ( स्थापत्य) चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील यांच्यासह अध‍िकारी – पदाध‍िकारी व सुदर्शन नगर, जवळकर नगर परिसरातील नागरिक आदी उपस्थ‍ित होते. सदर काम बी. जी. शिर्के कंपनी मार्फत करण्यात आले असून त्याकरीता सल्लागार म्हणून प्रसन्न देसाई आर्किटेक्ट यांनी काम पाहिले. तत्पुर्वी, झुम्बा व विविध देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सुत्रसंचालन गजानन पातुरकर यांनी केले. तर आभार स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी मानले.