पिंपरी चिंचवड शहरात “एक तास स्वच्छतेसाठी” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
264

पिंपरी, दि. १(पीसीबी) – “आम्ही शपथ घेतो की, आम्ही स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहू आणि स्वच्छतेसाठी वेळही देवू. आम्ही स्वत: घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम आम्ही स्वत: पासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्लीपासून, आमच्या गावापासून तसेच आमच्या कार्यस्थळापासून या स्वच्छतेच्या कामास सुरूवात करू. आम्हाला हे मान्य आहे की, जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वत: घाण करीत नाहीत व घाण करू देत नाहीत. या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मोहीमेचा प्रचार करू. आम्ही आज शपथ घेत आहोत, ती आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावू. आम्हाला माहिती आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल ” अशी स्वच्छता शपथ घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींनी,नागरिकांनी एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमात सहभाग नोंदविला आणि सर्वांना स्वच्छतेचा संदेशही दिला.

महात्मा गांधींच्या जयंती पुर्वी देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत श्रमदान केले जात आहे. याच अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आज सकाळी १० ते ११ या वेळेत ‘एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रम राबविण्यात आला. शहराला कचरामुक्त करून स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आठही प्रभागात आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छ सुंदर शहर करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका सतत प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व शहरवासियांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्‍त केले तसेच आजच्या स्वच्छता मोहिमेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल नागरिकांचे तसेच लोकप्रतिनिधींचे आभारही त्यांनी व्यक्‍त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या स्वच्छता मोहिमेची सुरुवात अ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौकातून स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली,

आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार उमा खापरे त्याचप्रमाणे माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, माजी नगरसदस्य संदीप वाघेरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, विद्यार्थी, मंडळे, गृहनिर्माण संस्था व स्थानिक नागरिकांनी शपथ घेतली आणि पिंपरी चौक व परिसरात स्वच्छता केली.

तसेच अ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने इतर ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहिमेस माजी महापौर मंगला कदम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक केशव घोळवे, सुनील कदम, माजी नगरसेविका मीनल यादव, शर्मिला बाबर उपस्थित होते .

ब क्षेत्रीय कार्यालय येथे स्वच्छता मोहिमेत माजी नगरसदस्य नामदेव ढाके, राजेंद्र साळुंखे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, गोविंद पानसरे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी तर नगरसदस्या संगिता भोंडवे, आश्विनी चिंचवडे, ज्योती भारती, उमा काळे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित कार्यकारी अभियंता जहीरा मोमीन आदी उपस्थित होत्या.

क क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने गाव जत्रा मैदान भोसरी येथे आमदार महेश दादा लांडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, समन्वयक उपायुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेवक संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, विलास मडिगेरी, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारीका लांडगे, सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, कार्यकारी अभियंता सुनील बागवानी अविरत श्रमदान संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश लोंढे ,संदीप बेलसरे, टाटा मोटर्स कंपनीचे कर्नल संजय कर्णिक व त्यांचे २०० स्वयंसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

ड क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिमेत आमदार अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, माजी नगरसेवक शंकर जगताप, अंबरनाथ कांबळे, शत्रुघ्न काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, विनायक गायकवाड, राजेंद्र जगताप, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, आरती चोंधे, निर्मला कुटे क्षेत्रीय अधिकारी किरण मोरे उपस्थित होते.

इ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने बैलगाडा मैदान भोसरी येथे आमदार महेश दादा लांडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, समन्वयक उपायुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेवक अँड. नितिन लांडगे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, विकास डोळस, हिराबाई उर्फ नानी घुले, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, कार्यकारी अभियंता सुनील बागवानी, अविरत श्रमदान संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश लोंढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

फ क्षेत्रिय कार्यालयाच्या माजी नगरसेवक एकनाथ पवार, शांताराम भालेकर, संजय नेवाळे, सचिन चिखले, प्रा.उत्तम केंदळे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, बापू घोलप, धनंजय भालेकर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप उपस्थित होते .

ग क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिमेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेविका विमल जगताप, मनिषा पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता अकबर शेख, सहाय्यक आरोग्य अधिकारी अविनाश दरवडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत बारणे, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, मराठवाडा मित्र मंडळाच्या औषधशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच विविध शाळांतील विद्यार्थी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये माजी नगरसेवक शंकर जगताप, अंबरनाथ कांबळे, शाम लांडे, सागर आंघोळकर, महेश जगताप, तर नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेंडगे, ‘सुजाता पालांडे, शारदा सोनवणे उपस्थित होत्या.

या उपक्रमात लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट, स्वच्छतादूत तसेच अधिकारी, कर्मचारी, अशासकीय व शासकीय संस्था, औद्योगिक कंपन्या, रिक्षा संघटना, टपरी, पथारी हातगाडी संघटना, फेरीवाले, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, पर्यावरण प्रेमी, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आदींनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि शहर स्वच्छतेचा संदेश दिला.

उपक्रमाबाबत बोलताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच स्वच्छतेसाठी आग्रही राहिली आहे. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला आणि स्वच्छतेविषयी गांभीर्य बाळगले तर निश्चितपणे स्वच्छताही होईल आणि आरोग्याच्या समस्या देखील दूर होतील. काही नागरिक आपल्या घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्याच्या कडेला इतरत्र फेकत असतात. त्यामुळे परिसर देखील अस्वच्छ होत असतो, म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेची जाणीव ठेवून गांभीर्यपूर्वक शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छतेचा हा संदेश समाजातील प्रत्येक घटकांमध्ये पोहोचावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक तास स्वच्छता हा उपक्रम राबविला जात आहे. शहरातील सुजाण नागरिक शहर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत आहेत. प्रत्येकाने स्वच्छतेविषयी गांभीर्य बाळगले पाहिजे. स्वच्छता करण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम देखील आपल्याला करायचे आहे. विद्यार्थ्यांचा या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग असतो, त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी जाईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.