‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी’

0
269

– भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाला निर्णय

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजिवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे.  अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण होवून तसेच काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जिवितहानीही झाली आहे. या नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे, अशी माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

राज्यात सर्वच ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शहरे व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातुन विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरु झाले आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.