पिंपरी-चिंचवड करांची कर आकारणी शास्तीकर वगळून घ्यावी,महाविकास आघाडी सरकारने दिले आदेश

0
293

पिंपरी,दि.१५(पीसीबी)- महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांची कर आकारणी शास्तीकर वगळून घ्यावी, म्हणून आदेश दिले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज(१५) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांना (विशेषत: रेडझोनमधील) शास्तीकर भरणेबाबत मिळकत जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक अडचणीत असलेले सर्व सामान्य नागरीक चिंताग्रस्त आहेत.यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री-मा.ना.अजितदादा पवार व नगरविकास मंत्री-मा.ना.एकनाथराव शिंदे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांचा शास्तीकर वगळून केवळ मुळ मिळकत कर भरून घेणेबाबत, असे आदेश व्हावेत व नागरीकांना दिलासा द्यावा, म्हणून विनंती केली होती.त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून मा.आयुक्त, पिं.चिं.मनपा यांना नागरीकांकडून शास्तीकर वगळून मुळ मिळकत कराचा भरणा स्विकृत करण्याच्या प्रस्तावास दि.31 मार्च 2021 पर्यंत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आदेशानुसार नागरीकांकडून शास्तीकर वगळून मुळ मिळकत कर भरणा स्विकृत करावा व याबाबतचे आदेश आपणांकडून संबंधीतांस व्हावेत, ही विनंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे केली आहे.