पिंपरी-चिंचवडमध्ये जागोजागी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरू होणार

0
218

पिंपरी दि. ५ ( पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी,  1 किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरु केले जाणार आहे. महापालिका मिळकती, खासगी मिळकतधारकाकडून भाडे तत्वावरील मिळकती किंवा कंन्टेनरद्वारे सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी वैद्यकीय विभागामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 8 रुग्णालये आणि 27 दवाखाने कार्यरत आहेत.  बहुविध शाख, व 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे वायसीएम रुग्णालयासह नवीन आकुर्डी, जिजामाता, थेरगाव, भोसरी अशी सुस्सज, अत्याधुनिक रुग्णालये आहेत.  या रुग्णालये, दवाखान्यांमध्ये नागरिकांवर उपचार केले जातात. महापालिकेने सीएसआरच्या माध्यमातून संपूर्ण  शहरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांचे मेडिकल गॅप अॅनालिसिस केले आहे. पायाभूत वैद्यकीय सुविधा महापालिकेच्या विविध भागामध्ये जिजाऊ क्लिनिक सुरु करण्याचे धोरण आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.

जिजाऊ क्लिनिकचे  फायदे!

# परिसरातील नागरिकांसाठी पर्याप्त आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहील
# रुग्णांची तपासणी व आवश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा

# नागरिकांना जागेवरच प्राथमिक उपचार मिळाल्याने  रुग्णालय, दवाखान्यावरील ताण कमी होणार

# वेळीच उपचार मिळाल्यास नागरिकांचे आरोग्य सुधारुन रुग्णवाढ होण्याच्या प्रमाणात घट
# रुग्णांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा, सुविधा पुरविणे शक्य

# गरीब नागरिकांना लवकरात-लवकर उपचार देणे शक्य होईल
# शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणा-या सेवा पुरविणे शक्य होईल
# महापालिका रुग्णालय, दवाखान्यात किरकोळ वैद्यकीय कारणांसाठी होणारी गर्दी कमी होईल
# रुग्णालयात अधिक चांगल्या प्रकारे उपचार उपलब्ध करुन देणे शक्य होईल