चिखलीमध्ये प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग

0
404

चिखली, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे आगीच सत्र सुरुच आहे. पहाटे अडीचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे प्लास्टीकच्या गोदामाला भीषण आग लागली. यात १७ दुकाने जळून खाक झाली आहेत. खासगी टँकर आणि महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगच काम सुरू आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली त्यापासून काही मीटर अंतरावर मशीद होती आणि शेजारच्या खोल्यांमध्ये १०० नागरीक राहात होते. आगीची घटना घडल्यानंतर त्यांना अगोदर रूमच्या बाहेर काढण्यात आलं. जीवितहानी झालेली नाही. सविस्तर माहिती अशी की, पहाटे अडीचच्या सुमारास चिखली कुदळवाडी येथील विसावा चौकात प्लास्टीकच्या गोदामाला भीषण आग लागली होती.

मध्यभागी मशीद आहे तर शेजारच्या २१ खोल्यांमध्ये १०० लोक राहत होते. त्यांना अगोदर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले, तसेच रुमधील गॅस सिलिंडर देखील बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर शेजारची तब्बल १७ दुकाने जळून खाक झाली.

सर्व दुकाने ही पत्र्याच्या शेड मध्ये होती. धुरांचे लोट आणि आगीच्या ज्वाळा खूप मोठ्या होत्या. खासगी सहा टँकर आणि बारा अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवण्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यश आले. अद्याप कुलिंगच काम सुरु असून आणखी चार तास लागतील. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच मशिदी शेजारील रुमधून नागरिकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, अग्निशामक अधिकारी नामदेव शिंगाडे, अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडेसह ४० कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.