पिंपरी चिंचवडची सुज्ञ जनता आम आदमी पार्टीला स्वीकारेल

0
423

– अत्रे सभागृह पिंपरी येथे आम आदमी पार्टीचा स्वराज्य संकल्प मेळावा संपन्न

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आम आदमी पार्टी चा पिंपरी चिंचवड मधील अत्रे सभागृहामध्ये दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत आणि पिंपरी चिंचवड चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या उपस्थिती मध्ये आपच्या इच्छुक उमेदवारांनी स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन केले.

या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष वहाब शेख, महेश बिराजदार आणि महिला शहराध्यक्ष स्मिता पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पंजाबच्या जनतेने ज्याप्रमाणे आप ला स्वीकारले त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मधील सुज्ञ जनता सुद्धा आम आदमी पार्टी ला नक्कीच स्वीकारेल असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. पालिकेने अनधिकृत ठरविलेल्या घरांमध्ये शहरातील 30 टक्के लोकसंख्या राहते, सत्ताधा-यांनी ही घरे अधिकृत करण्याच्या निर्णयाचा जो गाजावाजा करत प्रचार केला त्या प्रक्रियेद्वारे आकारले जाणारे शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारे नसेल तर असल्या फसव्या घोषणा काय कामाच्या? असा प्रश्न कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी उपस्थित केला.यावेळी बऱ्याच नवीन कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला

या मेळाव्यात नंदू नारंग डॉ रामेश्वर मुंडे वैजनाथ शिरसाठ डॉ अमोल डोंगरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात इच्छुक उमेदवारांच्या वतीने आपले विचार मांडले यशवंत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल मोरे व मंगेश आंबेकर यांनी केले.