पिंपरीत फ्लॅटचे कुलुप तोडून परसपर ताबा घेणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

0
615

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर त्या फ्लॅटमध्ये परसपर भाडेकरुन ठेवला आणि जाब विचारण्यास गेलेल्या फ्लॅट मालकीनला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना फ्लॅट नं. २, गॅलेड चौक पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी फ्लॅट मालकीन भाग्यश्री सुनील यादव (वय ४१, रा. नवी सांगवी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लता किसन कांबळे (रा. बलदेव नगर, पिंपरी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री यांचा सी ब्लॉक सीटी सर्व्हे नं. १९१८, दुसरा मजला फ्लॅट नं.२, गॅलेड चौक पिंपरी येथे स्वत:च्या मालकीचा फ्लॅट आहे. त्यामध्ये त्यांनी प्रिंटिंग मशीन आणि इतर साहित्य आणि कागदपत्रे ठेवली होती. आरोपी लता यांनी ६ नोव्हेंबर २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भाग्यश्री यांचा फ्लॅटचे कुलूप तोडले. तेथे स्वत:चे कुलुप लावून फ्लॅटचा ताबा घेतला. तसेच त्यामध्ये एक भाडेकरू देखील ठेवला. हे समजताच भाग्यश्री या लता यांना जाब विचारण्यासाठी गेल्या असता लता यांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.