पिंपरीतील दोन कैद्यांचे येरावडा कारागृहातून पलायन

0
644

पुणे, दि. १३ (पीसीबी) – गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील दोन कैदी येरावडा कारागृहातून पळून गेले आहेत. आज (शनिवारी) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हे दोन आरोपी पळून गेले आहेत.

हर्षद सय्यद (वय २०, रा. कासारवाडी), आकाश बाबुराव पवार (वय २६, रा. काळेवाडी) असे पळून जाणाऱ्या कैद्यांचे नावे आहेत. याप्रकरणी येरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांचे पथक या आरोपींचा शोध घेत आहे.