पालखी सोहळ्यापूर्वी आकुर्डीतील रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

0
306

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पालखी सोहळ्यापूर्वी आकुर्डीतील मुख्य बाजार पेठ मधील रत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी केली आहे.

आकुर्डी मुख्य बाजार पेठ मधील रत्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम बरेच दिवसांपासून सुरु आहे. आत्ता ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी कडून आकुर्डी मेन रोडकडे येणार रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याच्या कामामुळे एक महिन्या पासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून विठ्ठलवाडीकडून आकुर्डी बाजार पेठ मेन रोडकडे जावे लागत आहे.

ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणाचा एका बाजुचा रस्ता काम चालू असल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. पण, रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागत आहेत. छोटे अपघात देखील होत आहेत. येत्या 21 जूनला आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे.

आकुर्डी मधे एक दिवसा करता मुकामासाठी येणार आहे. लाखो वारकरी व भाविक भक्त संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शना साठी आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत असतात. पालखी सोहळ्या येण्याआधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडीकडून आकुर्डी मुख्य बाजार पेठ मेन रोडकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर वाहातुकी साठी चालू करावा अशी मागणी दळवी यांनी निवेदनातून केली आहे.