पार्थ अजून अपरिपक्व, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही – शरद पवार

0
416

मुंबई,दि.१२(पीसीबी) – माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे असं राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. याविषयी शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा.”