पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

0
337

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 1 मे 2021 रोजी रात्री एमआयडीसी भोसरी मधील अल्ट्रा इंजिनिअर कंपनीसमोर घडली.

ज्ञानेश्वर बालाजी घोरगंड (वय 23, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर 1 मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. रस्त्याने जाताना ते फोनवर बोलत होते. एमआयडीसी भोसरी मधील अल्ट्रा इंजिनिअर कंपनीसमोर आले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तीन चोरट्यांनी ज्ञानेश्वर यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.