पादचारी तरुणाचा मोबाईल तिघांनी हिसकावला

0
165

चिखली, दि. ८ (पीसीबी) – मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील तीन चोरट्यांनी हिसकावला. ही घटना 15 मे रोजी जाधववाडी, चिखली येथे घडली.

गणेश दत्तात्रय बनकर (वय 32 रा. जाधववाडी चिखली) यांनी बुधवारी (दि. 7) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथील विष्णू विहार सोसायटी समोरून फिर्यादी बनकर मोबाईलवर बोलत पायी चालत चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.