पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

720

कराची, दि. २४ (पीसीबी) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे, नवाज शरीफ यांनी याआधी देखील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पंतप्रधान पदावरून हटवले होते. फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी पुराव्या अभावी त्यांना निर्दोष सुटका करण्यात आली होती.

नवाज शरीफ यांच्यावरील सुनावलेल्या निर्णयानंतर न्यायालयाबाहेर मोठा गोंधळ झाला .  नवाज शरीफ यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची  झाली . गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला.

न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक यांनी फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल-अजीजिया प्रकरणी निकाल दिला. दरम्यान, या निकालापूर्वीच नवाज शरीफ रविवारी इस्लामाबादला  दाखल झाले  आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्यावर सुरू असलेल्या प्रकरणी निर्णय सुनावण्यासाठी आज (सोमवार) पर्यंतची डेडलाईन दिली होती.