पवार घराणे मरेपर्यंत एकत्रच राहणार, मोदीसाहेब तुम्ही काळजी करू नका – अजित पवार

0
729

सातारा, दि. २ (पीसीबी) – मोदीसाहेब पवार घराणे आजही एकत्र आहे. आणि भविष्यातही मरेपर्यंत एकत्रच राहील. याची तुम्ही काळजी करू नका, असा जोरदार पलटवार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) येथे केला.  

साताऱ्यात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार खासदार उद्यनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही आदर करत आलो आहे. पण आताचे पंतप्रधान हे जातीयवादी आहेत. भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांनी कधीही व्यक्ती आणि घराण्यावर टीका केली नाही. पण आताचे पंतप्रधान विकासकामांवर न बोलता घराण्यावर टीका करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. पक्षाध्यक्ष  शरद पवार यांचे पुतणे राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामुळेच तिकीट वाटपात अडचणी येत आहेत.  अजित पवारांच्या हातून शरद पवार हिटविकेट झाले आहेत,  अशा  शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी  सोमवारी वर्धा येथील सभेत टीका अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.